स्किन फॅक्ट्समध्ये आपले स्वागत आहे
भविष्यातील नाविन्यपूर्ण माहिती समर्थन प्रणाली

अधिक जाणून घेण्यासाठी समस्येवर क्लिक करा

मुरूमे

मुरूमे येणे ही त्वचेची सामान्य समस्या आहे. जेव्हा तुमच्या केसांचे फॉलिकल्स तेल व त्वचेच्या मृत पेशींमुळे बंद होतात तेव्हा मुरूमे होतात.2 बहुतेक वेळा ते चेहरा, कपाळ, छाती, खांदे आणि पाठीचा वरचा भाग येथे येतात.1 साधारणपणे वयात येणारी मुले व मुलींना ती होतात परंतु कोणत्याही वयात ती येऊ शकतात.1




केस गळणे

याला अॅ्लोपेसिया किंवा टक्कल असे देखील म्हणतात, याचा अर्थ डोक्यावरील किंवा शरीरावरील एखाद्या भागावरील केस गळणे.




बुरशी संसर्ग

फंगल इन्फेक्शन (बुरशी संसर्ग), ज्याला मायकोसिस/टेनिया असे देखील म्हणतात, ही बुरशीमुळे होणारा एक त्वचेचा रोग आहे.1 याला कारणीभूत बुरशीला देखील डर्मटोफायईटस म्हणतात.

बुरशीच्या अनेक प्रजाती असतात ज्या घाण, झाडे, घरातील पृष्ठभाग, आणि तुमच्या त्वचेवर राहतात.

त्वचेवरील बुरशी संसर्गामुळे दाह, लाल होणे, उंचवटा रेणे, वगैरे होते जे काही दिवसांपासून ते काही आठवडे राहते.




डार्क स्पॉटस

जेव्हा तुमच्या त्वचते अधिक प्रमाणात मेलानिन तयार होते तेव्हा डार्क स्पॉटस किंवा हायपरपिगमेंटेशन होते. यामुळे तुमच्या त्वचेवर डाग किंवा चट्टे उमटतात जे आजूबाजूच्या भागापेक्षा गडद रंगाचे असतात. त्यामुळे काही त्रास होत नाही परंतु त्या व्यक्तीच्या सौंदर्यात त्यामुळे अडथळा येतो.




कोरडी त्वचा

त्वचा कोरडी पडणे ही अतिशय अस्वस्थ करणारी स्थिती असते ज्यामुळे त्वचेची साल निघणे, खाज येणे आणि तडे पडणे असे होते. हे वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. ह्या स्थितीत तुमच्या त्वचेच्या स्तरात पुरेसा ओलावा नसल्यामुळे तो कोरडा पडतो.



Language